तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे.दिनांक 11 ऑक्टोबरपासून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत असून ते 19 ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी 12 ते 2 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून हे प्रसाद वाटप करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयासमोर दररोज साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप केले जात आहे.
