धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवचे ग्रामदैवत असलेल्या श्री धारासुर मर्दिनी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धाराशिवच्या प्रथम नागरिक नेहा  काकडे यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.

यावेळी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून शहराच्या सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वाला प्रारंभ झाल्याने मंदिर परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. धाराशिवच्या ग्रामदैवत असलेल्या आई धारासुर मर्दिनी देवीच्या आशीर्वादाने शहरातील सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि भरभराट नांदो, तसेच धाराशिव शहराची प्रगती निरंतर होत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. 


 
Top