तुळजापूर (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराज चौकात आई तुळजाभवानीच्या पवित्र ज्योतीचे प्रज्वलन करून शारदीय नवरात्र महोत्सव 2026च्या नियोजन व जबाबदारीच्या कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला. 

या पवित्र ज्योत प्रज्वलन प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माने, पोलीस प्रशासनातील अण्णासाहेब मांजरे तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते. मंदिर परिसरातील स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था आणि भाविकांच्या सोयी-सुविधांबाबत आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर शहर सज्ज करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top