तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाची नाशिक येथे घोषणा करण्यात आलेली आहे .त्यानुसार सदर योजनेमध्ये तेर गाव सहभागी होत असून याबाबत ग्रामपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांना या अभियानाबद्दल ग्राम पंचायत अधिकारी उमेश राठोड यांनी माहिती देऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तेर ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी यांची नियोजन बैठक घेण्यात आली.
