धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन शिवाजीराव तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान केले.

या नियुक्तीमुळे धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तावडे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, जनसेवेची परंपरा कायम राखणे आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करणे, या उद्देशाने तावडे यांच्यावर पक्षसंघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन तावडे यांनी सांगितले. या वेळी मनोज जगताप, आशिष पाटील,असद पठाण, इफ्तेकार मुजावर आदी उपस्थित होते.

 
Top