धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे सातत्याने पदवीधरांच्या संपर्कात असतात. त्यांनी आजपर्यंत पदवीधरांच्या समस्या जाणून घेऊन तळमळीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विधान परिषदेत आवाज उठून पदवीधरांना शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात अनेक योजना राबवल्या आहेत. विश्वास, अपेक्षा व जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी आजपर्यंत अनेक कामे केलेली आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे यांनी केले .
ते जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी तालुका धाराशिव येथे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मंगल नाईकनवरे होत्या. तांबे पुढे म्हणाले की राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढून 80 % अनुदान देण्यासाठी प्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांनी अनेक वेळा आंदोलने केली.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर अनुदानास प्राप्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन देण्यासाठी शासन स्तरावर येत्या काळात पाठपुरावा केला जाईल. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रशालेच्या पर्यवेक्षिका मंगल नाईकनवरे म्हणाल्या की आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले असून उर्वरित प्रश्नांचा पाठपुरावा करावा असा आशावाद व्यक्त केला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक प्रवीण पांगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन सहशिक्षक व्यंकट मेंढेकर यांनी केले. या शिक्षक मेळाव्यास प्रशालेतील शिक्षक,प्राध्यापक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार सहशिक्षक प्रमोद जाधव यांनी मानले.
