धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा= मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळास 2026 चा जिल्हा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व क्रीडा सेवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यापूर्वी मंडळाने राज्यपातळीवरील सतत तीन वेळेस तालुका, जिल्हा पातळीवरील पुरस्कार मिळवण्याचा मान मिळविलेला आहे.  राज्य पातळीवरील जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार शासनाने नुकताच जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथील पु ल देशपांडे अकॅडमी नाट्यगृहात दिनांक ऑक्टोबर 2026रोज, माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, क्रीडा व सांस्कृतिक कार्यमंत्री , सचिव यांच्या शुभहस्ते वितरण केले जात आहे. मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत धाराशिवकारांची समाज सेवा वर्षभर  व गणेशोत्सवाच्या माध्यमातून या दहा दिवसाच्या 

कालावधीत करण्याचा प्रयत्न मंडळाचे पदाधिकारी, गणेश दूत गणेश सेवक व गणेश भक्त करीत आलेले आहेत 62 वर्षाच्या कालावधीमध्ये मंडळाने विविध प्रकारच्या व विविध क्षेत्रातील पौराणिक, ऐतिहासिक  सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेच्या ज्वलंत समस्यांवर  संदेश व हलतेदेखावे मंडळाने सादर केलेले आहेत . समाज प्रबोधन, जनजागरण करण्याचा प्रयत्न मंडळ विविध उपक्रम , कार्यक्रम व मूर्तिमंत देखावे सादर करून जनप्रबोधन करीत आलेले आहे.राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू  गुणवंत कामगार पुरस्कतेॅ, काशिनाथ दिवटे वर्षापासून गणेश मंडळाच्या विविध देखावे बनवण्यामध्ये बिनासाच्याच्या मुर्त्या बनवून  अष्टपैलू आपली कलाकृती दाखविण्याचा प्रयत्न अखंडपणे आजही चालू ठेवलेला आहे. हे मूर्तिकार, चित्रकार यांनी हे देखावे बनवण्यासाठी कसल्याही प्रकारचे मानधन व मोबदला घेतला गेलेला नाही.मंडळ  देखावे विकत आणत  नाही,व विकतही नाही.

अत्यंत निस्वार्थपणे श्री च्या चरणी आपली भक्ती आजही अर्पित करत आलेले आहेत. यावर्षीचा देखावा  लंका दहन हलता देखावा वीस फूट उंचीवरून व 40 फूट लांबीवरून हनुमान सोन्याची लंका  दहन करत असलेला प्रसंग सादर केला आहे. रावण हा राजा अत्यंत बुद्धिमान,शूर, धाडसी  व  अमरत्व प्राप्त झालेला पण अहंपणा, गर्व ,घमंड इत्यादी गुणांच्यामुळे विनाशाकडे जावे लागले. जीवनामध्ये  सत्ता संपत्ती पद इत्यादीचा गर्व करू नये. . हा देखावा मंडळाच्या रंगमंचकावर सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर असंख्य  चित्र व प्रसंग चित्रित करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावून शिवमय वातावरण निर्माण केला होते. त्याचप्रमाणे स्त्रीभ्रूणहत्या रोखा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा ,या धर्तीवर गेली अनेक वर्षापासून बालिका जन्मोत्सव शासकीय रुग्णालयात लक्ष्मी आगमन ते आवाहन या तीन  दिवसांत  पूर्वी मुली आहेत आज मुलगीच झाली व पहिली मुलगी झाली  ती आनंदाने  स्विकारली अशा  मातांचा बालिकांचा  जन्मोत्सव साजरा करण्यात  येतो 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत निधी पाठविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षीरक्षाबंधनाच्या दिवशी मंडळाच्या महिला भगिनी वर्गाने वीर जवानांच्या साठी सीमेवरील जवानांना राख्या पाठवून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.  चांद्रयान तीन यशस्वी मोहिमेबद्दल इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना  राख्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पाठवून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले . मंडळ दरवर्षी एक विशिष्ट  थीम घेऊन वर्षभर कार्य करीत आले आहे, बालविवाह मुक्त महाराष्ट्र ,साक्षर व्हा, निरक्षरता पळवा, स्त्रीभ्रूण हत्या रोखा, रक्तदान ,अवयव दान, देहदान श्रेष्ठदान ,कारगिल विजय असो, कोरोना मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा अभिजात दर्जा ,ऑपरेशन सिंदूर ,व्यसनमुक्त युवक नशा मुक्त भारत ,असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य केले जात आहे.

त्याचप्रमाणे मंडळ गेली  62 वर्षांमध्ये देशावर राज्यावर आलेल्या आपत्ती संकटावर  महापुराने भूकंपाने किंवा विविध प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आलेल्या संकटावर निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी पाठविण्यात आला आहे आहे .

माजी सैनिकांच्या मदतीसाठी सैनिक ध्वजनिधीही जमा करण्यात आलेला आहे. मंडळाने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अवयव दान, रक्तदान, नेत्रदान इत्यादी विषयी जनजागृती व चळवळ मोहीम अभियान यशस्वी करण्या प्रयत्न केलेला आहे. स्वाधार निराधार व मतिमंद 110 मुलींचा सांभाळ करणाऱ्या या संस्थेस यावर्षी मदत निधी रुपये वीस हजार मंडळाच्या वतीने देण्यात आले . आंतरराष्ट्रीय  भरडधान्य वर्ष म्हणून साजरा होत आहे त्या निमित्ताने मंडळाने अंगणवाडी सेविका, शिक्षिका, बालकांना खाऊ वाटप, भरड धान्याचे महत्व जनजागृती पोम्प्लेट वाटप करून केलेले आहे.  दिव्यांगांसाठी एक दिवस आपल्या या गणेशोत्सवाच्या आनंद उत्सवात सामान्य माणसासारखे सामावून घेऊन   त्यांनाही जीवनाआवश्यक असणाऱ्या गरजेच्या  वस्तूंचे वाटप व खाऊ वाटप करून माननीय श्रीमान आमदार बच्चू कडू (भाऊ ) राणा जगजीत सिंह पाटील आमदार ,ओमराजे निंबाळकर खासदार, कैलास पाटील आमदार ,प्रवीण स्वामी आमदार, बसवराज पाटील आमदार, सुजीत सिंह ठाकुर आमदार,नगराध्यक्ष, सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष व विविध मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले. दुर्लक्षित, वंचित , दलित घटकांना या पूजा विधीचा मान व सन्मान दरवर्षी करीत आहे .तृतीय पंथीय या वर्गातील यांना पूजेचा मान व त्यांचा सन्मान करून सामान्य माणसाप्रमाणे आपले हे जीवन जगावे व आपण स्वतःला तुच्छ व इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत कमीपणाचा भावना नष्ट  व्हावी. या  दुर्लक्षितवर्गांना ही सामाजिक स्थान मंडळांनी दिले आहे.

गणेश उत्सवाच्या या कालावधीत एक दिवस महिलांच्या कर्तुत्वाचा, महिलांच्या गौरवशाली परंपरेचा, त्यांच्या संस्काराचा, सन्मान करण्याची परंपरा आजही मंडळाने जपलेली आहे. गुजराती मारवाडी सुंदर कांड समाज, रामचरितमानस महिला मंडळ सुंदर कांड विविध महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर अथर्वशीर्ष व गीता पठण, हनुमान चालीसा, स्तोत्र भक्त श्रीच्या चरणी भक्ती अर्पण केलेली आहे. अनेक महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा सन्मान विविध क्षेत्रातील महिलांना मुलींना शिक्षण, क्रीडा, समाज, अर्थ, राजकारण, निष्ठा संसार सांभाळून आपलं कार्य व आपलं कर्तुत्व या विसरलेल्या नाहीत हे मंडळाने आपल्या आदर्शाची जपवणूक सन्मानातून करीत आहे. मंडळ भारतीय लोकशाहीचे संविधान, विविध धर्मीय  मुख्य ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी बायबल कुराण जैन व बौद्ध धर्मीय ग्रंथांची श्री च्या समोर पूजेसाठी ठेवून भारतीय राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे व वाढली पाहिजे या भावनेपोटी प्रमुख पाहुणे व सन्मानार्थी यांच्या शुभहस्ते पूजा केली जाते मंडळाने अनेक वर्षापासून श्री च्या प्रतिष्ठापन्नेपासून  ते श्री च्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डीजे लावून धिंगाणा करण्याची संस्कार जपलेले नाहीत .लेझीम खेळाने दीडशे मुल  मुली वयाच्या तीन वर्षापासून ते 80 वर्षाच्या वयापर्यंत ची आपल्या खेळातून विविध प्रकारची कला व कौशल्य आजही दाखवीत आलेली आहे .या ठिकाणी वाद्य वाजविणारी मंडळी हे मंडळाचेच कलाकार असतात मंडळाचे स्वयंसेवक असतात कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत देत नाहीत .हे स्वयंप्रेरणेने  आत्मविश्वासानं ,आत्मनिर्भरतेने, दीडशे मुलांचा संघ निर्व्यसनिपानाचा ठामपणाने संदेश खेळातून देत आलेले आहेत .धाराशिव या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, रोटरी क्लब ,लॉयन्स क्लब, नगरपरिषद,  जिल्हाधिकारी व पोलीस कार्यालय व पत्रकार संघाच्या वतीने विविध पारितोषके व सन्मान इत्यादी  मंडळाने व शासनाने पारितोषिकी ठेवले .ती सर्व सन्मानाने मिळालेली आहेत. पारितोषिक मिळावीत म्हणून यासाठी अट्टाहासने प्रयत्न करावा लागत नाही.  मंडळाच्या कार्याची दखल महाराष्ट्र  शासनाने अनेक वर्षापासून जिल्ह्याचे प्रथम पारितोषिक दिले आहे .याही वर्षी शासनाने जिल्ह्याचे प्रथम पारितोषिक श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्ली  यांना दिले आहे. मंडळाने लेझीम पथक महाराष्ट्राबाहेर तिरुमल्ला- तिरुपती येथील ब्रह्मोत्सवाच्या या कार्यक्रमात अनेक वर्षापासून सादर केलेली आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध राज्यांमध्ये लेझीम पथक शासनाच्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची शान,  ग्रामीण भागातील मर्दानी लेझीम खेळ म्हणून नावाजलेल्या खेळाला ,चेन्नई, हैदराबाद ,विजयवाडा, अलाहाबाद इ. या सादर करण्याचा संधी मिळाली महाराष्ट्राची शान टिकविण्यास संधी मिळाली आहे. 

मंडळ स्वातंत्र्य सैनिक ,माजी सैनिक व राष्ट्रीय सेवा दलास शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ स्वयंसेवक यांचा सन्मान, एसटी महामंडळाने 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल व जनतेची सेवा अत्यंत मनोभावी केल्याबद्दल 75 कर्मचाऱ्यांचा सन्मान करणारे एकमेव मंडळ आहे.मंडळाच्या या कार्यामध्ये गणेश भक्तांचा, गणेश सेवकांचा, गणेश दूतांचा, फार मोठा वाटा श्रद्धायुक्त, भक्तीभाव, प्रसन्न व आनंदीमय वातावरणात संपन्न करण्याचे कार्य करीत आले आहे. या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातून सेवा कार्य करण्याचा प्रयत्न मंडळ अखंडपणे करीत आले आहे. या मंडळाच्या कार्याची दखल घेऊन शासनाने चार वेळी पुरस्कार देऊन एक आगळीवेगळी प्रेरणा व प्रोत्साहन मंडळाच्या या निरव्यसनीयुक्त तरुण मुलांना देऊन अखंडपणे श्री च्या चरणी भक्ती अर्पण करून सेवा देत राहावी ही पारितोषिक निमित्त  ठरते.


 
Top