धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी अत्यंत प्रतीकुल परिस्थितीमध्ये स्पर्धा परिक्षेचा सात-आठ वर्षे अभ्यास करतात. परंतू  मार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे पेपर फुटी, अनियमितता, गैरप्रकार यामुळे आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे. 

या प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता आणली जावी, पेपर फुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच रिक्त असलेल्या सर्व शासकीय पदांची माहीती तात्काळ जाहीर करुन मेगाभरती प्रक्रिया चालु करण्यात यावी. परिक्षा ऑन लाईन ऐवजी ऑफ लाईन पद्धतीने पार पाडाव्यात, खाजगी कंत्राटी नोकर भरती त्वरीत बंद करुन सरकारने एमपीएससी मार्फतच भरती करण्यात यावी या मागण्यांची त्वरीत दखल घ्यावी. येत्या चार दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात निर्णय न घेतल्यास लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे. 

 
Top