भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि भविष्य सुरक्षिततेसाठी गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ तातडीने अंमलबजावणी करा. या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांनी 9 तारखेच्या मोर्चामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन केले आहे. सर्वांनी परिवारासह मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या मोर्चाच्या नियोजनासाठी धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीस धाराशिव जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागदे, उपाध्यक्ष रोहित थोरवे, लहू पडवळ, अंकुश शिंदे, विकास मदने, रमेश बसगुंडे, खंडू पवार, शरद गायकवाड, देवसिंग रजपूत, तानाजी घोडके व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तातडीने अंमलबजावणी करा, अपघात विमा योजना लागू करा, आरोग्य सुविधा उपलब्ध करा, पेन्शन योजना लागू करा, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत द्या, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या सोडवा, शासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करा. धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.