.

धाराशिव (प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण महाराष्ट्रात व कर्नाटक यात कमी पावसामुळे गंभीर परिस्थिती सुरू झाली आहे शेतकरी व शेतमजूर यांचा खरीप हंगाम हातचा गेल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जनावरांचा चारा - पाण्याचा प्रश्न महागाई आणि तरुणा पुढील बेरोजगारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासद ठेवीदार व कर्जदार यांना दिलासा देण्यासाठी संचालक मंडळाने बँकेच्या नफ्यातून उभारलेल्या राष्ट्रीय आपत्ती निधी मधून महाराष्ट्र राज्याकरिता 25 लाख रूपये  जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये जनता बँकेचा वर्धापन दिन असतो. वर्धापन दिनाचा खर्च वाचवून त्यांनी या निधीत वाढ केली आहे. कर्नाटक राज्यासाठी 11 लाख रूपये देण्याची घोषणा चेअरमन वसंत नागदे यांनी केली आहे. 



 
Top