धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक येथे  पीएनजी ॲन्ड सन्स धाराशिव शाखा आयोजित मेलडी डेझ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालपण ते पूर्णजीवनावर आधारित संलग्न गीत गायन त्या अनुशंगाने चित्रे व प्रत्यक्ष चित्रकार निर्माण करतो अश्या सुंदर कार्यक्रमाच्या मेजवानी चा आस्वाद धाराशिव च्या रसिकांनी अनुभवला त्यामुळे कलावंताची संघटना असल्याने कलाकारांचा मानसन्मान म्हणून जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने मेलडी डेझचे कलावंत उन्मेष शहाणे, सौ. सुवर्णा शहाणे , कुमारी अपुर्वा शहाणे , यतिन काजळे , चित्रकारा दर्शना धुमाळ, बासरी वादक सचिन वाघमारे ,यांचा पुष्प गुच्छ, दैनंदिनी देऊन करण्यात आला. या प्रसंगी संस्कार भारती देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक तथा जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हासचिव शेषनाथ वाघ, जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, सौ.ज्योती भन्साळी, सौ.वैष्णवी अक्षय भन्साळी,डॉ. सचिन टिके, पीएनजी शाखा व्यवस्थापक पुंडलिक जाधव, राज कुमार लिंगदालकर, राघव गाडगीळ, अजय गायकवाड,वैभव तांबे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा अक्षय असा की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदी ठेवा हेवा, दावे करू नका, माफ करण्यास शिका स्वच्छ जीवन जगा.


 
Top