तेर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. 

14 वर्षे वयोगटात मल्लखांब साठी स्वराज्य अबदारे याने प्रथम पटकावला व  विभागीय स्तरावर निवड. 65 किलो वजन गट (19 वर्ष) वयोगटात सुरज नागलबोणे याने प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्तरावर निवड, 60 किलो वजन गटात (17 वर्ष) वयोगटात साक्षी थोरात प्रथम व विभागीय स्तरावर निवड,50किलो वजन गटात (17 वर्षे) वयोगटात सायली वाघ याने तृतीय क्रमांक पटकावला, 63 किलो वजन गटात रोशनी देवकुळे हीने द्वितीय क्रमांक पटकावला, 50 किलो वजन गटात (17 वर्ष) गणेश अष्टेकर द्वितीय क्रमांक पटकावला,  75 किलो वजन गटात (17 वर्ष )वयोगट शंतनू नाईकवाडी याने द्वितीय क्रमांक पटकावला, 60 किलो वजन गट (17 वर्षे) वयोगटात आदित्य सुतार याने द्वितीय क्रमांक पटकावला,50 किलो वजन गटात वय (वर्ष 19 )मध्ये स्नेहा कदम हीने तृतीय क्रमांक पटकावला.  यशस्वी विद्यार्थी यांचा  व क्रीडा मार्गदर्शक नवनाथ पसारे यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. बेद्रे , पर्यवेक्षक एस.एस. बळवंतराव व शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top