धाराशिव (प्रतिनिधी)-  साखर हंगामापूर्वी ऊस वजन-काटे डिजिटल करुन प्रत्यक्ष दर्शनी लावून जिल्हाधिकारी कार्यालयास जोडण्यात यावेत व सध्याची वजन काट्याची तपासणी भरारी पथकामार्फत करावी अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी साखर आयुक्त डॉ.संजय कोलते यांच्याकडे केली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम दि.15 ऑक्टोंबर 2026 पासून सुरु होणार आहे. प्रती वर्षाप्रमाणे साखर कारखान्यांकडे ऊस वाहन गेले असता शेतकऱ्यांना ऊसाचे वजन प्रत्यक्ष दर्शनी दिसने अपेक्षीत आहे. परंतू जिल्हयातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये दर्शनी भागामध्ये वजन काटे नाहीत व ते शेतकऱ्यांना दिसत नाहीत. यापूर्वीही लेखी पत्राद्वारे साखर आयुक्तांना यासंदर्भात मागणी केलेली असताना अद्याप त्यावर कसलीही कारवाई झालेली नाही.

तरी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना डिजिटल वजन काटे प्रत्यक्षदर्शनी लावणे ते जिल्हाधिकारी कार्यालयास जोडणे तसेच साखर कारखान्यांचे सध्याचे वजनकाटे भरारी पथकामार्फत ताबडतोब तपासणी करण्यात यावी याबाबत संबंधीतांना आदेशीत करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे. 

 
Top