तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कोष्टांबिकादेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे पुरातन श्री.कोष्टांबिकादेवी मंदिर असून या मंदिरात पाषाणाची श्री.कोष्टांबिकादेविची मुर्ती असून चतुभ्रूज आहे.एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात शुल तर तिसरा हात पोटावर ठेवलेला असून चौथा हात मांडीवर ठेवलेला आहे.या मंदिरात दर मंगळवारी व पौर्णिमेला भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.नवरात्र महोत्सवात दररोज दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.नवमीच्या रात्री होमहवन करण्यात येते.तर विजयादशमी दिवशी शमिपूजन करून शिमोल्लघंनास प्रारंभ होतो.विजया दशमी दिवशी श्री संत गोरोबा काका यांची पालखी श्री संत गोरोबा काका यांच्या घरापासून शिमोल्लघनासाठी निघते व श्री.कोष्टांबिकादेवीची पालखी मिळून मुख्य रस्त्यावरून शिमोल्लंघनासाठी निघून श्री संत गोरोबा काका यांची पालखी श्री संत गोरोबा काका यांच्या घरी येते तर श्री कोष्टांबिकादेवीची पालखी कोष्टांबिकादेवी मंदिरात येते.यावेळी तेरकर शिमोल्लंघनासाठी मोठ्या संख्येने पालखी सोहळयात सहभागी होतात.
कोष्टांबिकादेवी मंदिरात मंत्रोच्चारात घटस्थापना
धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कोष्टांबिकादेवी मंदिरात मंत्रोच्चारात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. नवरात्र महोत्सवानिमित्त श्री कोष्टांबिकादेवीची विधीवत महापूजा करून नवरात्र महोत्सवास घटस्थापना करून प्रारंभ झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.
