धाराशिव (प्रतिनिधी)-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने तुळजाभवानी स्टेडियम, क्रीडा संकुल, धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत रुपामाता विद्यालय, पाडोळी (आ.) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची नांदेड येथे होणाऱ्या विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 17 वर्षे मुले वयोगटातून अभिजीत राजेंद्र पवार, 19 वर्षे मुले वयोगटातून पुष्कराज प्रदीप गुंड आणि 19 वर्षे मुली वयोगटातून सृष्टी गौतम एकंडे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील, समुद्रवाणी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय पांचाळ, समुद्रवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख कांतिनाथ ढोले, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश मनसुळे, युवा उद्योजक  संदीप एकंडे, पालक शाहूराज शिंदे तसेच खेळाडूंचे मार्गदर्शक क्रीडाशिक्षक बापू शेख यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सातत्याने यश संपादन केल्यामुळे परिसरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे. आगामी विभागस्तरीय स्पर्धेतही या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी दिल्या आहेत.

 
Top