येरमााळा (प्रतिनिधी)- श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची रविवार (ता.11) रात्री आठ वाजता देवीचे मानकरी,पुजारी यांच्या हस्ते झालेल्या घटस्थापनेने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असुन आज देवीचे मानकरी, देवस्थान ट्रस्टच्या पुजाऱ्याच्या हस्ते देवीच्या मुख्य गाभाऱ्यात,मंदीर परीसरात असणाऱ्या सर्व लहान मोठया मंदिरात घटस्थापना करुन देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची धाकटी बहीन श्री.येडेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव रविवार (ता.11) ते 26 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा दरम्यान नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.
आज देवीची पारंपरिक नागवेलीच्या पानाने देवीच्या तांदळ्यावर पुजा करुन रात्री आठ वा.देवीची पंचोपचार महापुजा,महाआरती मानकरी,देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.नवरात्र काळात देवीच्या तांदळ्यावर वेगवेळ्यात रुपात असणाऱ्या येडेश्वरी देवीची पुजा करण्यात येतात.
देवीच्या नवरात्र काळात घट स्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला पाच दिवस खेटे घालण्याची प्रथा आहे. गावातील,पंचक्रोशीतील मलकापूर,उपळाई,पानगाव,रत्नापूर,दुधाळवाडी,बांगरवाडी येथील भाविक खेटा घालण्यासाठी येतात. लहान मुलं,पुरुष,अबाल वृद्ध,महिलांची पहाटे पासुन गर्दी असते बाहेर गावच्या भाविकांची श्रावण महिण्यात खेटे घालण्यासाठी गर्दी असते. तर बारामाही येणारे भाविकही देवीच्या मंदिराला खेटे घालतात यामुळे पूर्वी सुमारे दीड किमीचा खडकाळ,चडउतार,कठीण असलेला खेटा मार्ग म्हणजे आपल्या हातुन घडलेल्या लहान मोठ्या चुकांचे परिमार्जन म्हणुन खेटा घातला जात असावा. पण सध्या हा कठीण खेटा मार्ग देवीला येणारा प्रत्येक भाविक,विशेषतः नवरात्र काळात महत्व असल्याने वनविभागाने पर्यटन निधीतून रंगबीरंगी पेव्हरब्लॉक वापरुन दोन मिटर रुंदीचा सुशोभीत केला आहे.पहाटे खेटे घालतात म्हणुन स्थानिक पर्यटन निधीतून पथदिवे बसवून खेटावाट प्रकाशमय केली आहे.
देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या घट स्थापणेसाठी गावातील भाविकांसह, पंचक्रोशीतील भाविकांनी पुरणपोळीच्या नैवद्यासह गर्दी केली होती.आज नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाल्याने बाहेरगावच्या भाविकांची दर्शणासाठी गर्दी झाली होती सभामंडप दर्शन रांगेतून दर्शनासाठी दीड तास वेळ लागत होता.

