धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि अरविंदनगर, केशेगाव सन 2026-27 चा 23  बॉयलर अग्निप्रदिपण कार्यक्रम वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेचे महासंचालक संभाजी कडु-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलता कडुपाटील या उभायातांच्या शुभहस्ते व कारखाना संस्थापक सहकार रत्न  अरविंद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 यावेळी विधिवत मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी केले.  या 23 वर्षातील गाळप हंगामाचा आढावा घेऊन ऊस कमी असताना जास्त झाल्यावर सुद्धा सभासद बिगर सभासद यांचा ऊस  पाऊस पडेपर्यंत कारखाना चालवून गाळप केल्याचा आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केला. सहकारामध्ये ही संस्था दादाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासदांच्या विश्वासावर कार्यरत असल्याचे नमूद केले. या हंगामामध्ये 25 मोठे वाहन दीडशे मिनी ट्रॅक्टर 60 हार्वेस्टर च्या माध्यमातून कारखाना 15 ऑक्टोंबर पासून ऊस गळफा साठी सज्ज असल्याचे जाहीर केले.

 त्यानंतर प्रमुखातिथी संभाजी कडू पाटील यांनी कारखान्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवल्याबद्दल विशेष गौरव केला.

 अध्यक्ष मनोगत मध्ये अरविंद दादा यांनी पावसाअभावी परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये खचून न जाता जसे पाठीमागच्या काळात बाहेरून पाणी न घेता उसातील पाण्यावर कारखाना चालवला आणि आलेल्या अडचणीवर मात केली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी सुद्धा कमी पाण्यावर ठिबकचे प्रमाण वाढवून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून परिसरामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी आहे तो ऊस जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी कारखाना संचालक, ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सीजनमध्ये हा कारखाना चांगल्या पद्धतीने ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देण्याचे सहकार्य करण्याचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून मत मांडले.

 
Top