भूम (प्रतिनिधी)-  भूम तहसील कार्यालयया मार्फत दि.14 ऑक्टोबर 2026 रोजी सावित्रीबाई फुले सभागृह येथे घेण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत दाखल झालेल्या एकूण 260 प्रकरणाचा जाग्यावर निपटारा करण्यात आला. 

या अभियानात विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि महसूलविषयक सेवांचा समावेश होता.नागरिकांना शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आल्या या अभियानात तहसील कार्यालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, उत्पन्न दाखल्यांचे 24, मालमत्ता हस्तांतरणानंतर वीज जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविण्याचे 20, प्रलंबित घरगुती वीज जोडणीचे 29, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण 63 आणि आरोग्य तपासणीची 46 प्रकरणे निकाली काढण्यात आली.याशिवाय, आयुष्मान कार्डची 27, महिला शेतकरी यांना प्रमाणपत्र वाटपाची 12, आधार कार्डची 9, उत्पन्न प्रमाणपत्राची 9, जन्म-मृत्यू नोंद दाखल्यांची 4, रक्तदान शिबीर 4, डोमिसाईल प्रमाणपत्राची 2, महिला बचत गट नोंदणीची 2 आणि नव्याने नळ जोडणी देण्याची 1 सेवा पूर्ण करण्यात आली. या अभियानातून नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार प्रवीण जाधव, विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top