तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील पळसप येथील शंभुराजे गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी101 रक्तदात्यानी रक्तदान केले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रमेश मुटाळ, रवी बादल ,अशोक खंडागळे, सुर्यकांत निलंगे, अशोक घाडगे, चंद्रकांत लाकाळ, शहाबाज पटेल, शंभु ढगे, बालाजी लाकाळ, शिवनयन नरवडे, सुजित गजधने, अजय चव्हाण, विकास सुरवसे, प्रविण निलंगे, ज्ञानेश्वर दाणे, अमित काळे, अशोक बादल, समीर कवडे अमोल बादल आदीनी परीश्रम घेतले.गणेश मंडळातर्फे रक्तदात्यांना विशेष बक्षीस देण्यात आले . यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ यांनी भेट देऊन रक्तदाब शिबिर आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले.
