भूम (प्रतिनिधी)-  श्री आलमप्रभू शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, भूम यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‌‘आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार' धनलक्ष्मी माधव पोतरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव (पा.), केंद्र पाथरूड, ता. भूम, जि. धाराशिव यांना दिनांक 27 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले. 

पुरस्कार वितरण सोहळ्यात पोतरे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व गौरवपूर्वक सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यात आला. शिक्षक म्हणून आपल्या जबाबदारीकडे केवळ अध्यापनाचे कार्य म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची संधी म्हणून पाहत त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी योगदान दिले आहे.

शाळेतील विविध उपक्रमांमध्ये पालक, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचा सहभाग वाढविण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावी, या उद्देशाने शाळेतील विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे.


 
Top