धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व श्री. लंबोदर तरुण गणेश मंडळ, उंबरे कोटा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरामध्ये 28 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून, समाजातील प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अभय इंगळे व इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभय इंगळे, रोहित देशमुख, लंबोदर तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी अर्जुन पवार, किशोर पोतदार, चंद्रकांत पांढरे, संतोष शेरकर तसेच मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.
