धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि विश्वाला ज्ञान, समानता, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन साजरा करण्यात आला.श्रीचक्रधर स्वामीचा अवतार भाद्रपद शुद्ध द्वितीया या तिथीला झाला. शासकीय मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.सदर प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण , प्रा माधव उगिले, डॉ. बालाजी गुंड , कनिष्ठ विभागातील इंग्रजी विभागात कार्यरत असणारे प्रा क्षीरसागर,प्रा शेख,प्रा.चौगुले राहुल जगताप यांच्या सह सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
