तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने खरीप पिक हिरावला गेलयाने गणेशोत्सवा त शनिवार दि 1 2 रा रोजी तीर्थक्षेत्र तुळजापुरात बस स्थानकास समोरील चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना तर रविवार दि 13 रोजी तुळजापुरात अक्कलकोट रस्त्यावरील मंगरूळ येथे सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र इंगळे यावेळी बोलताना म्हणाले की पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. जेव्हा पाऊसच पडला नाही आणि पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तर पंचनाम्याची गरजच काय?” पिके हातातून गेल्याने शेतकरी जगण्यासाठी आपल्या ले जमिनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याचे इंगळे यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांना भगतसिंगाचे रूप घ्यावे लागेल आणि स्वातंत्र्याची लढाई पुन्हा एकदा लढावी लागेल,” असा इशाराही इंगळे यांनी दिला.
मंगरूळमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता रोको
तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर मंगरूळ येथे रविवारी, दि. 13 रोजी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगरूळसह पंचक्रोशीतील तब्बल 400 ते 500 शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. मंगरूळ परिसरातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, पीकविमा दावे तात्काळ निकाली काढावेत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, दुष्काळी योजना लागू कराव्यात, वीजमाफी करावी, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करावी आणि तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंददादा डोंगरे, सतीश डोंगरे, चित्तरंजन सरडे, सुनील जाधव, श्याम पाटील, सौदागर जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.
शहरात सणाचा उत्साह; गावाकडे दुष्काळाचा आक्रोश
एकीकडे तुळजापूर शहरात गणेशोत्सवामुळे सणाचे वातावरण आहे; बाजारपेठेत उत्साह आहे. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांतही शेतकरी आनंदापासून दूर राहून आपल्या जगण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, अखिल भटक्या-विमुक्त जमाती, जाती-जमाती महासंघ तसेच विविध गावांतील शेतकऱ्यांनीही कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
