धाराशिव (प्रतिनिधी)- संजय किसनराव भोजगुडे वय 57 वर्षे यांचे आरएमडी हॉस्पिटल पुणे येथे रक्तदाब कमी झाल्याने दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी निधन झाले.  गेल्या आठवड्यात त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी पत्नी असा परिवार आहे.

दिवंगत संजय भोजगुडे यांचे वडील किसनराव भोजगुडे यांनी साधारणतः 1967 साली भोजगुडे फ्रेम मेकर हा व्यवसाय सुरू केला होता. दगडू व संजय या बंधूनी आधुनिक पद्धतीने काळाची पावले टाकून समय सूचतेने हा व्यवसाय वृद्धिगतपणे यशस्वी केला. दिवंगत संजय भोजगुडे हे दर्जेदार फ्रेम तयार करण्यात पारंगत होते.

 
Top