धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीततील स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने शतकांशतकापासून श्रीकृष्ण जन्मोत्सव, दहीहंडी फोडण्याचा व काल्याचा प्रसाद वाटप करण्याची परंपरा श्रीकृष्ण जन्माष्टमी या उत्सवाच्या  वतीने आज तागायत टिकून ठेवली आहे . यावर्षीची दहीहंडी व्यसनमुक्त युवक व नशा मुक्त भारत हे थीम घेऊन साजरा करीत आहे .गेल्या अनेक वर्षापासून ऑपरेशन सिंदूर , कोरोना मुक्त महाराष्ट्र, चांद्रयान तीन यशस्वी, कारगिल विजयी दिन, बालिका जन्मोत्सव, स्त्रीभ्रूणहत्या रोखा- मुली वाचवा, साक्षर व्हा- निरक्षर हटवा , डिजिटल युग येऊ द्या- भ्रष्टाचार हटवू या बालविवाह मुक्त महाराष्ट्र “अशा विविध या नावाने अक्षर फुग्याच्या माध्यमातून बनवून तयार केलेली बॅनर लावून होती. समाजात लोकप्रबोधन जनजागृती अंधश्रद्धा विविध परंपरा यांना फाटा देण्यासाठी एक घोषवाक्य विधायक कार्य करण्यास संदेश समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने दहीहंडी उत्सव गवळी गल्लीतील मंडळ करीत आले आहे.दहीहंडी फोडल्यानंतर काल्याचा प्रसाद खाण्यासाठी व मिळण्यासाठी एकमेव ठिकाण गवळी गल्ली  आहे. अशी प्रतिक्रिया कृष्ण भक्तांच्या कडून येत होती. महिलांसाठी मुलीसाठी व मुलांसाठी अशा स्वतंत्र दोन दहीहंडी बांधली जाते.  मुली व मुलांना स्वतंत्रपणे दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो . गोविंदा आला रे आला या गीतावर व जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता दहीहंडीच्या पाठीमागे मुख्य भूमिका संघटन एकजूट सहकार्य नेतृत्व होऊन परस्पर समन्वयाची भावना गरीब श्रीमंत विविध जातीतील विषमता ही नष्ट करणारी दहीहंडी आहे यावेळी श्रीकृष्ण श्री गजानन व तुळजाभवानी मातेची पूजा करण्यात आली अत्यंत मंत्रमुग्ध व भक्तिमय वातावरणाच्या व काशिनाथ दिवटे यांच्या आवाजात करण्यात आली. लहान थोर पाण्यातील भिजण्याचा आनंद घेऊन मनोरा रचण्यासाठीची धडपड ओले अंग पाय घसरत असताना देखील दहीहंडी फोडायला मिळावी हा प्रयत्न युवक व युवती करीत होत्या मनमुराद नाचणे आणि भिजणे हा एक आगळा वेगळा आनंद लुटात होते यावेळीगर्दी महिलांची मुलींची व पुरुषांची रस्त्यांच्या दुतर्फा होती .पाण्याचे तुषार ,कारंजे यामध्ये लहान थोर भिजण्याचा आनंद व गोविंदा आला रे अशा  कृष्णांच्या विविध गीतावर नाचण्याचा मोह आवरला जात नव्हता.  तासभर लेझीम खेळाचा ढोल ,ताशा, हलगी , बुलबुल  संबळ, ड्रमप्याड, यांच्या एक ताल,एक सूर या संगीतामध्ये 100 मुला मुलींचा ताफा यावेळी उपस्थित राहून दहीहंडी फोडणे उत्साह . गोपाळकाल्याचा प्रसाद खाणे. व्यसनमुक्त युवक नशा मुक्त भारत निर्माण करो अशा घोषणा दिली तरी सर्व कृष्णभक्ताने उपस्थित राहून सह भागी होऊन गोविंदाना प्रेरणा व आनंद द्विगुणीत केला. त्याचे लहान थोर पदाधिकारी व सदस्य हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले महिलांचा मुलींचा लहान मुलांचा एक वेगळा आनंद मिळत गेला.


 
Top