तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत बाळूमामा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
सकाळी संत बाळूमामा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.सायंकाळी म्होतरवाडी येथील गोरख साठे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खंडू शिरगिरे,प्रविण बंडे,शुभम गायके, सचिन देवकते,अजून कोकरे, प्रकाश सुतार, अभिमान कोकरे, संतोष ईमडे व भाविकभक्त यांनी परीश्रम घेतले.
