धाराशिव (प्रतिनिधी)- नीट-2026 परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक 247 मिळवून उत्तीर्ण झालेल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र कु. पारस महावीर कंदले यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला.
पारस कंदले यांचा येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. देशातील नामांकित वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेत प्रवेश मिळवून पारस यांनी धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मान उंचावली आहे.
पारस यांचे वडील महावीर कंदले हे कुमाळवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई सुनीता कंदले या जिल्हा परिषद शाळा, सारोळा बुद्रुक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे यशस्वी फलित म्हणून पारसचे हे यश पाहिले जात आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या हस्ते पारस कंदले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, धाराशिवचे संचालक मेहबूब पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीसह दिलदार लायक अली पटेल यांची उपस्थिती होती. यावेळी पारस यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
