धाराशिव (प्रतिनिधी)- एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टर पदासाठीच्या परीक्षेचा पेपर फुटला त्या पेपर फुटी विरोधात एमपीएससी तयारी करणाऱ्या युवक युवतींनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. यावेळी एमपीएससी अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय भोरे यांनी केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रस्तावना वाचनाने मोर्चाची सुरुवात होऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर एमपीएससी करणारा युवक प्रथमेश देशमुख याने आत्महत्या केली त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून पायउतार करण्यात यावे व त्या ठिकाणी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमण्यात यावेत. तसेच गट ब परीक्षेतील आक्षेपांवर आठ दिवसांत स्पष्टीकरण देऊन गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.मुंबई क्राईम ब्रँचने ला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी बोलताना ॲड.संजय भोरे हे म्हणाले की,पेपर फुटीच्या घटना थांबल्या नाहीत तर युवक सरकारला घाम फोडतील त्यामुळे सरकारने वेळीच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळीच शासन करावे तसेच अशा घटना होणार नाहीत यासाठी स्वच्छ प्रतिमेचे अध्यक्ष, सचिव व इतर अधिकारी नेमावे असा पुनरुच्चार केला. राकेश सूर्यवंशी यांनी देखील फक्त काही युवक धनदांडगे असल्यामुळे त्यांना वेगळा न्याय व गरिबाला वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी आर एस अकॅडमीचे राहुल शिरसाट, लोंढे, बालाजी आवटे,नाईकवाडी, विक्रम राऊत, संदीप गायकवाड, अभिराज कदम, सत्यजित पडवळ, योगेश गरड, पंकज स्वामी,गुरुनाथ आवटे, राहुल शिरसट, महेश सरपाळे, मयूर लोंढे,,महेश शिंदे,अक्षय पवार,निखिल शिंदे,सौरभ काळे, ज्ञानेश्वरी देवकर, अस्मिता राठोड, अंजुम शेख, निकिता जाधव आदींसह एमपीएससी तयारी करणारा युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
