धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील सोनाई फंक्शन हॉल येथे शनिवार संगीत मंडळ धाराशिव आयोजित पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत समारोहात देशातील मोजकेच जलतरंग वादक त्यापैकी च मिलींद तुळणकर यांचा धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने दैनंदिनी , पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तबला वादक हनुमंत फडतरे, पखवाज वादक असाराम कांबळे ,देवगिरी प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे, धनंजय जेवळीकर, अभिजीत शेळके, रविंद्र कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, अक्षय भन्साळी उपस्थित होते.
