धाराशिव (प्रतिनिधी)-  रुपामाता परिवारातील रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. 02, रोशनपुरी, ता. माजलगाव, जि. बीड येथे गळीत हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर बॉयलर व मोळी पूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला. युनिटचा हा चौथा यशस्वी गळीत हंगाम आहे.

ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवर दांपत्यांच्या शुभ हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजनाची विधिवत पूजा करण्यात आली. यामध्ये उद्धव ताकट व सविता उद्धव ताकट, रखमजी कबळे व मुक्ताबाई रखमाजी कबळे, सतीश शिंदे व कावेरी सतीश शिंदे, रामप्रसाद गोळेकर व द्वारकाबाई रामप्रसाद गोळेकर तसेच अमोल नाईकनवरे व आकांक्षा अमोल नाईकनवरे यांचा सहभाग होता. यावेळी रुपामाता परिवाराचे संस्थापक ॲड. व्यंकट विश्वनाथराव गुंड पाटील व संचालक शंकर गाडे यांची प्रमुख उपस्थितीती होती. कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेतकरी, ऊस वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गळीत हंगाम 202627 यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास अनिकेत नवले, अंगदराव कटके, बाबा कबळे, संतोष कदम, वशिष्ठराव डांगे; प्रवीण सोळंके यांच्यासह परिसरातील सरपंच, माजी सरपंच, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युनिटचे जी.एम. राठोड एम. जी., चीफ इंजिनियर नकाते एस. डी., चीफ केमिस्ट भालचंद्र सोळंके, शेतकी अधिकारी रामप्रसाद शेषराव गोळेकर व सिक्युरिटी अधिकारी मुंजा वैराळे यांचीही उपस्थिती होती. यावेळी ॲड. अजित गुंड कार्यकारी संचालक  रुपामाता उद्योग समूह, धाराशिव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

 
Top