तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुरातन श्री त्रिविक्रम मंदिरात वामन जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी वामन जयंती निमित्ताने महाअभिषेक करण्यात आला.वामन जयंती निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज आचार्य यांचे वामन अवतार यावर प्रवचन संपन्न झाले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
