धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस, धाराशिव येथील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक औषध निर्माता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी होते. प्रमुख पाहुणे म्हणून  नितीन गाढवे, औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिफळ तसेच श्रीमती भाग्यश्री माळी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेगाव उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी औषध निर्माण क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. नितीन गाढवे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या औषध निर्माण क्षेत्रातील विविध शासकीय नोकरीच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तयारीबाबत माहिती दिली.

श्रीमती भाग्यश्री माळी यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आयुष्यात कोणतेही यश प्राप्त करता येते, असा संदेश दिला. जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी, रिल मेकिंग, रांगोळी आणि क्विझ स्पर्धा आयोजित  करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती अबोली निरवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. अजहर शेख यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी. फार्मसी, डी. फार्मसी आणि एम. फार्मसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top