धाराशिव (प्रतिनिधी)- माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. विजयकुमार भगवानराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, ॲड. विश्वजीत शिंदे यांच्यासह दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.त् यांच्या निधनाने धाराशिव जिल्हा वकील वर्तुळात शोककळा पसरली आहे.
ॲड. विजयकुमार शिंदे यांनी विधी क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय काम केले असून, त्यांनी चार वर्षे जिल्हा सरकारी वकील म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. तसेच येथील आर. पी. लॉ कॉलेजच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, तेथे अध्यापन करून त्यांनी कायद्याचे अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
