तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथे दलित वस्ती सुधार योजना, जनसुविधा व नागरी सुविधा योजनांतर्गत मंजूर 1 कोटींच्या निधीतून माळी प्लॉटिंग, दलित वस्ती तसेच गोदावरी परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्ते व नाली बांधकामाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,ग्राम पंचायत अधिकारी उमेश  राठोड, स्नप्निल नाईकवाडी,नवनाथ नाईकवाडी, हनुमंत कोळपे,  राहुल गायकवाड, गोरख माळी, नरहरी बडवे,सुनिल गायकवाड, अतुल इंगळे, गणेश फंड, अमोल थोडसरे,बाळासाहेब सौदागर, जहांगीर कोरबू,अभिमान रसाळ,नानासाहेब पवार,कांचन इंगळे, विठ्ठल लामतुरे,प्रतिक नाईकवाडी,किशोर काळे, प्रसाद राऊत, अविनाश खांडेकर,बाळासाहेब रसाळ, वैभव डिगे, अशपाक शेख,उषाताई सजे, मुमताज तांबोळी, जोशीला लोमटे व नागरिक उपस्थित होते.


तेर येथे मॉडेल व्हीलेज प्रकल्पाअंतर्गत मेळावा 

तेर येथे 'मॉडेल व्हिलेज' प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व महिलांसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला आहे. प्रकल्प सहाय्यक एन.एस.जोशी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, प्रकल्प विशेष तज्ञ एस.ई.हेलाले, एम.बी.चौंदते, विशेष तज्ञ एस. बी.राऊत, तंत्रज्ञान समन्वयक ए.व्ही., नागलगावे, आर.एम कॉर्डिनेटर बी.बी.माने,कृषी व्यवसाय तज्ज्ञ श्रीराम हेळाले, एचआरडी मोनिका चौदांते, तंत्रज्ञान समन्वयक अरुण नागलगावे,एनआरएम समन्वयक  ब्रह्मदेव माने, समूह सहाय्यक दीप्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक राम शिंदे यांनी केले.

 
Top