तुळजापूर (प्रतिनिधी)- सणासुदीच्या दिवसांत तुळजापूर शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहरवासीयांसह देवीभक्त हैराण झाले आहेत. पाच-पाच मिनिटांनी वीज ये-जा करत असल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबत असून विद्युत उपकरणे जळण्याचा धोकाही वाढला आहे.

आधीच दुष्काळाच्या संकटाने जनता त्रस्त असताना वीज मंडळाच्या अनियमित पुरवठ्याचा आणखी एक फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरात विजेचा हा खेळखंडोबा सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

विशेषतः तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने सणासुदीच्या काळात देवीभक्तांची मोठी गर्दी असते. अशावेळी वारंवार वीज जाण्यामुळे भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. “वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाकडे आणखी किती दिवस मागणी करायची?” असा संतप्त सवाल शहरवासीय करत आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास शहरवासीय आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा नागरिकांतून दिला जात आहे. 


 
Top