धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात थोर भारतीय विचारवंत, राजकीय अभ्यासक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.मंजुळकर यांनी दिन दयाल उपाध्याय यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञाना विषयी माहिती दिली,ते म्हणाले की पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय योजना सुरू करण्यात आली,या योजनेअंतर्गत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविणे हा उद्देश होता, एक मानवतावादी दृष्टिकोन पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी समाजासमोर ठेवला,या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
