धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल जुनी इमारतीत गुरुवर्य के.टी.पाटील यांच्या 97 जयंतीनिमित्त व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या 65 व्या दिनानिमित्त संस्था सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील यांच्या संकल्पनेतून रांगोळी,फेटा, मेंहदी आयोजन केले होते . 7 व 8 सप्टेंबर रोजी  प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या प्रतिमेचे पुजनासह दिप प्रज्वलन करून कार्यशाळेचे प्रशिक्षकांचा संस्था सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, युवा नेते अभिराम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमारे 500 विद्यार्थ्यांने या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. रांगोळीचे प्रशिक्षण धाराशिव शहरातील रांगोळीकार सौ. अस्मिता शिंदे बिरंजे , धाराशिव जिल्हा संस्कार भारती रांगोळी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत सुलाखे , फेटा प्रशिक्षण तुळजापूरचे फेटा बांधणीकार शिव शंभु फेटा ग्रुपचे चंद्रकांत भोसले व विकास साठे यांनी प्रशिक्षण दिले . विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर या सर्व कला जोपासल्या हव्या तसेच संस्कृती जोपसली जावी म्हणून अश्या कार्यशाळे चे आयोजन व्हावे असे मनोगत सौ. प्रेमाताई पाटील यांनी व्यक्त केले . हि कार्यशाळा यशस्वती तेसाठी मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे ,उप मुअ प्रमोद कदम , पर्यवेक्षिका सौ.बी.बी.गुंड ,6 वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, कार्यशाळा प्रमुख तथा 5वी पर्यवेक्षक शेषनाथ वाघ , रांगोळी कार्यशाळा प्रमुख सौ.संगिता शिंदे , मेंहदी सौ.जयश्री मस्के , सौ.एस.बी.कुदळे,सौ.पी.डी.इंगळे, सौ.ए.ए.देशमुख , सौ.एम.पी. ठाकूर , सेवक नाईक सुहास ताटे व सर्व सेवक वृंद यांनी परिक्रम घेतले संबंध कार्यशाळेचे सुत्रसंचलन संदीप जगताप यांनी केले तर आभार शेषनाथ वाघ यांनी मानले .

 
Top