परंडा (प्रतिनिधी)-गटशिक्षण कार्यालय परंडा येथे तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत  विविध अल्मिको साहित्य बुधवार दि. 23 रोजी वाटप करण्यात आले.

हे साहित्य तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश इंगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यामध्ये श्रवण यंत्र 4 दिव्यांग विद्यार्थी, व्हीलचेअर 4 दिव्यांग विद्यार्थी, रो लेटर 3 दिव्यांग विद्यार्थी तसेच बौद्धिक अक्षम मुलांसाठी  TLM (शैक्षणिक साहित्य किट) 15 दिव्यांग विद्यार्थी असे एकूण 21 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी  गटशिक्षण कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक  सर्व विषय साधन व्यक्ती सर्व विशेष शिक्षक व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


 
Top