धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील गवळी गल्ली येथील बाल हनुमान गणेश मंडळ हे पावित्र्य, संस्कार, भक्तीभावचे  जनजागृती केंद्र आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले. 

माजी अध्यक्ष जिल्हा परिषद जीवनराव गोरे यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आले. यावेळी नावलौकिक मिळविलेल्या संस्था व व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला. श्रीच्या पूजा विधी आदित्य गोरे जलसंचय वृक्षारोपण करणारे,  विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक धावारे व चव्हाण, 22 हजाराची पुस्तके शाळेला भेट देणारी हरहर गणेश मंडळ पदाधिकारी उमाकांत शिरसागर, मनोज वाघमारे, संगीत रत्न पुरस्कार मिळालेले दीपक लिंगे, राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील, मराठा महिला आघाडीच्या प्रमुख शिलाबाई लोकरे, महिला मागासवर्गीय अध्यक्ष वनिता गंगावणे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.  यावेळी मुर्तीकार काशीनाथ दिवटे यांचे कौतुक केले, मंडळाचे पदाधिकारी प्रा. गजानन गवळी, डॉ. अजित नायगावकर, संजय पाळणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार भालचंद्र हुच्चे व राजकुमार दिवटे यांनी मानले. 


 
Top