परंडा (प्रतिनिधी)-- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सुरू असलेल्या निधी संकलन उपक्रमाला नागरिकांकडून विविध स्वरूपात सहकार्य मिळत आहे.याच उपक्रमात हिंदवी सुजित शिंदे हिने आपल्या वाढदिवसानिमित्त शिवस्मारक समितीसाठी आपली बचतपेटी (गुल्लक) देत आगळ्या पद्धतीने योगदान दिले.
हिंदवीच्या या उपक्रमाचे शिवस्मारक समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी युवा नेते विश्वजित पाटील, सुजित शिंदे, रणजित शिंदे, अजित शिंदे आणि नितीन डाके उपस्थित होते. तिच्या या छोट्याशा योगदानातून “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास शिवस्मारक उभारणीच्या कार्याला मोठी मदत होऊ शकते, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
