परंडा (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील व जिल्हाध्यक्ष  दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड तालुकाध्यक्ष अरविंद रगडे यांनी पत्रकाद्वारे केली असून त्यात तालुका उपाध्यक्षपदी नानासाहेब कातुरे, तालुका सरचिटणीसपदी जयदेव गोफणे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्षपदी दिपक गायकवाड तर किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पदी प्रमोद लिमकर यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे व तालुकाध्यक्ष अरविंद रगडे यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top