धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा कार्यकारणीची बैठक माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. आगामी काळातील पक्ष संघटनेची वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि विविध उपक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या कार्यकारणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या विवीध आघाड्यांमधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तसेच धाराशिव जिल्हा कार्यकारणी मध्ये नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाबाबत दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अभियानाचा उद्देश, त्याअंतर्गत राबविण्यात येणारे विविध सेवा व सामाजिक उपक्रम तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, तसेच आगामी काळात पक्षाचा जनाधार अधिक व्यापक करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी अनिल काळे, नेताजी पाटील, नितीन भोसले, साहेबराव घुगे, गणेश खरसडे, अस्मिताताई कांबळे, धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहाताई काकडे तसेच जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.