धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात जूनपासून आजपर्यंतच्या कालावधीत पर्जन्यातील तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने या तालुक्यामध्ये ट्रिगर -1 प्रथम कळ लागू झाली असल्यामुळे या तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‌‘ट्रिगर-9 (प्रथम कळ)' लागू झाली आहे. त्या तालुक्यांतील पीक नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयाने 26 सप्टेंबर रोजी याबाबत पत्र काढले आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद, उपविभागीय कृषी अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व तालुका कृषी अधिकारी आणि सर्व गटविकास अधिकारी यांना त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सन 2026 च्या खरीप हंगामात जूनपासून आतापर्यंत विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका पिकांना बसला आहे.त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने काही तालुक्यांमध्ये ‌‘ट्रिगर-1 (प्रथम कळ)' लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


शेतातील नुकसानीची वस्तुस्थिती प्रशासनाच्या नोंदीत

पावसातील खंड आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झालेल्या शेतकऱ्यांसाठी पंचनाम्याची ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची स्थिती,छायाचित्रे आणि जीपीएस को-ऑर्डिनेटच्या आधारे नुकसानीची नोंद केली जाणार असल्याने प्रत्येक बाधित क्षेत्राची वस्तुस्थिती प्रशासनाच्या नोंदीत येणार आहे.

 
Top