धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातंर्गत ब्लॉग लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा अक्षय स्वामी हे म्हणाले की, एखाद्या संशोधक विद्यार्थ्यांला नियमित संशोधनपर आलेख लेखन करावयाचे असते. पण आजच्या आधुनिक व इंटरनेटच्या युगात वाचकांची संख्या घटत चालली आहे. तेंव्हा यावेळी इंटरनेटवर ब्लॉगच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती आपले संशोधनपर व समाजोपयोगी साहित्य वाचकांपर्यंत पोहचवू शकतो. कारण आज ब्लॉग वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ब्लॉग लेखनाची भाषा सहज व सोपी असते. आकर्षक शिर्षक देऊन कमीत कमी शब्दांत सुध्दा माहीती देता येते. गरजेनुसार छायाचित्रे, व्हिडिओ,स्वकथन, अनुभव यांचा वापर करता येतो. सर्वात म्हणजे वाचकांच्या प्रतिक्रिया येथे आपणास प्राप्त होऊ शकतात. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मंगेश भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख यांनी केले.
यावेळी डॉ संदीप देशमुख, डॉ केशव क्षीरसागर,प्रा माधव उगिले, डॉ सी .आर दापके, ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राचार्य डॉ ए के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.आभार डॉ.बाबासाहेब भोसले यांनी मानले.
