धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यात यावर्षी 48 टक्के पाऊस झालेला आहे. या पडलेल्या कमी पावसामुळे बारा महिन्याचे पीक असणाऱ्या ऊसाचे उत्पादन 40 टक्केवर येणार आहे.ऊसाला मागील तीन महिने पासून पुरेसे पाणी मिळत नाही. आज तर सर्व बोअर, विहीरी आटल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस, साखर कारखाने, गुळ पावडर, रसवंती व जनावरांच्या चाऱ्यासाठी देणे भाग पाडत आहेत. यामुळे ऊसाचे वजन मोठ्या प्रमाणात कमी होत असून साखरेचा उताराही कमी येणार असल्याने शेतकऱ्याला प्रती टनामागे 500 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे.
साखरेचे किमान हमीभाव 50 रुपये प्रती किलो करण्यात यावा, इथेनॉलचा दर विक्री प्रती लिटर 70 रुपये करण्यात यावा. मागील आठ वर्षापासून साखरेची एमएसपी वाढलेली नाही. सध्या साखरेच्या किमान आधारभुत भाव वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचा हमीभाव कमी असल्यामुळे व भारतामध्ये येऊघातलेल्या बाहेर देशातील साखरेच्या विना आयात ड्युटी माफीच्या साखरेच्या आगमनामुळे साखरेची भाव पुन्हा जैसे थे होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे साखरेची प्रती क्विंटल 50 रुपये करावी. अन्यथा लोकशाही मार्गने या तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.