परंडा (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र शासनाच्या तहसील कार्यालय, निवडणूक विभाग, परंडा आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परंडा तहसीलचे तहसीलदार निलेश काकडे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नायब तहसीलदार प्रसाद टिळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांनी १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून नोंदणी करणे हे त्यांचे महत्त्वाचे नागरी कर्तव्य असल्याचे सांगून मतदार नोंदणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच मतदानाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी नायब तहसीलदार प्रसाद टिळे यांच्या हस्ते १८वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६ वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास व्यासपीठावर मंडळ अधिकारी एम.एन. सातपुते, ग्राम महसूल अधिकारी बी.आर.डावखरे, तहसील कार्यालयातील कर्मचारी अमोल हंकारे, रोहित जाधव, तसेच डॉ.शहाजी चंदनशिवे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.अरुण खर्डे, डॉ.बी.बी.राऊत, डॉ.विद्याधर नलवडे,डॉ.विशाल जाधव,डॉ.सचिन चव्हाण.प्रा.डी.जी.पवार ,प्रा.वरपे रणजीत आदि उपस्थित होते.   शिबिराच्या माध्यमातून नव मतदार विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीबाबत प्रत्यक्ष माहिती व मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयक जागृती निर्माण झाली. प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार  मानले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top