धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संस्थेच्या वतीने संस्थेचा 64 वा वर्धापन दिन तसेच संस्थेचे संस्थापक व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक गुरुवर्य के. टी. पाटील सर (बप्पा) यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव येथील हातलाई मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच प्रमुख उपस्थिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती राहणार आहे.
संस्थेच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या गुरुवर्य के. टी. पाटील सर यांच्या कार्याचे स्मरण करण्याबरोबरच संस्थेच्या 64 वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुधीर आण्णा पाटील व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
