तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगर परिषद पाठीमागील गट क्र. 972 येथे चालु असलेले बांधकाम थांबविण्याची नोटीस नगरपरिषदेने काढले आहे.
नगरपरिषेने सदर रेल बांधकाम धारकास काढलेल्या नोटीसित म्हटले आहे की, नगर परिषद तुळजापूर हद्दीतील सिटी सर्वे क्र. 972 पै 731 चौ.मी भाजी मंडई या जागेसाठी आरक्षित असलेल्या जागेचे भूसंपादन पूर्ण होऊन सदर जागेची मालकी नगर परिषद तुळजापूरकडे हस्तांतरीत झाली असताना दिशाभुल करुन मिळवण्यात आलेला परवाना तात्काळ रद्द करुन संबंधिता विरुध्द कायदेशीर कार्यवाही करुन सदर जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेऊन सार्वजनिक
हितासाठी वापर करणे बाबत तक्रारी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. तरी सदर विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या उपलब्ध कागदपत्राचे अवलोकन केले. असता सिटी सर्वे क्र. 972 पै. 731 चौ.मी क्षेत्राचे भूसंपादन निवाडा भूसंपादन अधिकारी कार्यालयामार्फत दि. 30/10/1978 रोजी नगर परिषदेच्या नावे झालेला असुन सदर जागेचा मावेजा नगर परिषदेने अदा केलेला आहे. याबाबत दि. 10/07/2026 रोजी झालेल्या सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या चर्चेअंती या कार्यालयामार्फत आपणास देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी नुसार चालु असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे असे आपणास संदर्भ क्र. 03 अन्वये कळविण्यात आले होते. तरी संदर्भ क्र.04 अन्वये आपण आपले लेखी म्हणने या कार्यालयात सादर केले असुन आपण दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता सदर जागेवरील भूसंपादन रद्द झाले असल्या बाबतचे कोणतेही कागदपत्रे दिसून येत नाहीत.
तरी आपल्या जागेत आजरोजी स्थळ पाहणी केली असता आपणामार्फत बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास येत असून सदर बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा आपल्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 व नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक अधिनियम 1965 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. अशी नोटीस जागा मालकाला बजावली आहे.