उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयत डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे ग्रंथालय येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. विजय सरपे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थांनी ग्रंथालय याचा वापर करून आपले व्यक्तिमत्व विकसित करावे असेआव्हान केले. प्रमुख व्यक्ते म्हणून प्रा. चव्हाण देविदास यांनी ग्रंथालय हे आधुनिक काळातील ज्ञान व्रद्धिंगत करणारा महत्वाचे स्रोत आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, तसेच महाविद्यालयाचे ग्रंथापाल अखिल शेख यांनी विद्यार्थांनी दररोज किमान एक तास तरी ग्रंथालयात उपस्थित राहून आपल्या मध्ये पुस्तकाबद्दल वाचनाची गोडी निर्माण करावे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अमोल इंगळे यांनी केले. तर आभार प्रा. पवार भाऊ यांनी आभार मानले. यावेळी प्रा. तेजस्विनी करंडे, मोरे विजय, दुर्गे माधव,आदित्य सूर्यवंशी, सुरवसे दगडू व प्रशिक्षण्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
