धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा प्रत्यक्षात दहा महिने अनवाणी चालून व शासन दरबारी निवेदने निदर्शने रास्ता रोको सारख्या मार्गाने मांडून पूर्ण केल्याबद्दल काल दिनांक 8. 8.2026 रोजी आंबेवाडी येथे संजय पाटील दुधगावकरांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी आंबेवाडी चे मा. सरपंच नवनाथ क्षीरसागर, रामभाऊ पडवळ, शिवाजी निंबाळकर, राजेंद्र जाधव सर, नानासाहेब जमदाडे, ज्ञानेश्वर जाधव, योगेश जाधव, विजय क्षीरसागर, रवी दरेकर, मारुती गोडसे, प्रशांत झेंडे, रंजीत गोडसे, सुरेश तोट, अभिषेक दळवे, अजित जाधव, गौरव सुतार, गणेश क्षीरसागर, सागर दरेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
